Friday 8 July 2016

Hot Jupiters HD

AstroFeed #3
We thought that our solar system was normal. Watch to see how hot Jupiters proved it wrong!



Friday 1 July 2016

Exo Planets HD

AstroFeed #2



AstroFeed #2

What are Exo planets?

If they are so far away from us, how do we know if they are habitable or not?

Watch to Know!



Friday 24 June 2016

Black Hole in the Middle of Milky Way HD

We are releasing AstroFeeds every Friday.

Subscribe to our YouTube channel and learn some interesting facts about astronomy!



Tuesday 31 May 2016

Street Show HD

We arrange free street shows by setting up the telescope at the road sides and public places arising an interest in astronomy to a common man. The celestial objects for the telescopic observation can be moon, Saturn, Jupiter or Venus. We organise street shows on demand also.





Monday 4 April 2016

Join Astrotainment'16 by Astron

आकाशदर्शनाच्या पलीकडे…

आकाशातल्या ग्रह ताऱ्यांचे गूढ उकलण्याचा प्रयत्न पुरातन काळापासून चालू आहे. वेदांसह जगातल्या इतरही प्राचीन वाङ्मयामधले खगोलीय संदर्भ अचूक असल्याचे आधुनिक खगोलविज्ञानाने सिद्ध केले तर मन स्तिमित  होते. चंद्रावरचे माणसाचे पहिले पाउल , आवकशामध्ये विहरणारा पहिला मानव, विश्वाच्या कानाकोपऱ्याचा  धांडोळा  घेणारी  अवकाशातली अजस्त्र हबल दुर्बीण यासारख्या महत्वाच्या टप्प्यांनंतर खगोलशास्त्राने बरीच मजल मारलेली आहे पण तरीही ग्रहताऱ्यांच्या गुढापैकी बराच भाग अजूनही शिल्लक अहे.
विज्ञानाच्या इतर शाखांमध्ये वैज्ञानिकाला प्रयोग मांडून त्यांचा अभ्यास करणे शक्य असते परंतु खगोलशास्त्रामध्ये हे शक्य नाही. खगोलशास्त्र म्हणजे आपल्या भोवतालच्या भौतिक विश्वाचा अभ्यास, हे एक प्रचंड आणि आकर्षक आव्हान आहे. खगोलशास्त्रज्ञ एखादा प्रयोग मांडून ठेऊ शकत नाहीत किंवा खगोलविज्ञानातील एखादा पैलू बाजूला काढून फक्त त्याचाच अभ्यास सुद्धा करू शकत नाहीत. हे विश्व जसे आहे तसे संपूर्ण विचारात घेऊन त्याची निरीक्षणे घेणे शास्त्रज्ञाला भाग असते. त्यामुळे खगोलशास्त्र  निरीक्षणांवर आधारित माहिती, तिचे काळजीपूर्वक विश्लेषण यांवरच आवलंबून आहे.
खगोलशास्त्र हा एक गुंतागुंतीचा आणि न कळणारा विषय आहे असे समजण्याचे कारण नाही. भारतातल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या विषयात रस घेऊन पुढील संशोधन करण्याची गरज तर आहेच पण समाजातल्या सर्वांपर्यंत खगोलशास्त्राची निदान प्राथमिक माहिती पोहचल्यास खगोलशास्त्राकडे अधिकजण वळतील यात शंका नाही.
खगोलशास्त्राची प्राथमिक माहिती रंजक पद्धतीने पोहचविणाऱ्या कल्पक उपक्रमांची गरज भरून काढण्यासाठी तज्ञ आणि कलावंत या दोघांनीही पुढाकार घ्यायला हवा. पुण्याजवळची जायंट मेट्रेवेव रेडीओ टेलिस्कोप (GMRT) हि जगातली सर्वात मोठ्ठी रेडीओ दुर्बीण म्हणजे खगोलप्रेमींची पंढरीच..!! या दुर्बिणीचे कामकाज समजून घेणे हे अतिशय रंजक आहे. मनोरंजनातून खगोलशास्त्र, यामध्ये आकाशदर्शनाचा समावेश आवश्य करायला हवा. आकाशातले तारे जोडले कि कशी राशी आणि नक्षत्रांची चित्र तयार होतात? सर्व तारे ध्रुवताऱ्याभोवती का फिरतात? डोक्यावर दिसणारे तारे पाहून पृथ्वीवरचे आपले स्थान कसे ओळखू येते? या प्रश्नांची उत्तरे चकितच करून टाकतात. ग्रीक पुराणामधल्या राशी-नक्षत्रांच्या कथा आणि भारतातील कथा या रंजक तर आहेतच पण त्यांच्यामुळे ताऱ्यांच्या जागा लक्षात ठेवणे अतिशय सोप्पे होऊन जाते. टेलिस्कोप मधून शानिभोवतालचे कडे प्रत्यक्ष बघताना डोळ्यांचे पारणे फिटते. चंद्रावरची विवरे बघताना डोळे दिपून जातात. गुरुवरती वादळामुळे तयार झालेले पट्टे आणि त्याचे नैसर्गिक उपग्रह बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो आणि साध्या डोळ्यांनी ढगासारख्या दिसणाऱ्या आकाशातल्या पुंजक्याची जागा टेलिस्कोप मधून पाहिल्यावर असंख्य ताऱ्यांचा पुंजका घेतो तेव्हा खरंचच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ग्राहमालेच्या पलीकडे अनंत पसरलेल्या विश्वाची नुसती कल्पनादेखील विश्वरचनेतील मानवाचे खूजेपण जाणवून देते.  एका अर्थी आपल्या जीवनविषयक दृष्टीकोनातच बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आकाशदर्शनाच्या एका च अनुभवामध्ये दडलेले असते.
इन्फोटेन्मेन्ट आता बऱ्यापैकी रुळलेला शब्द..! त्याच धरतीवर  "ॲस्ट्रोटेन्मेंट"  का असू नये? त्यामध्ये खगोलविषयक सुंदर फिल्म्स आणि प्रेसेंटेशन्स , आकाशदर्शन , गोष्टी, प्रश्नमंजुषा असे उपक्रम राबवायला शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घ्यायला हवा. ॲस्ट्रोटेन्मेंटचा कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच काहीतरी नवे देऊन जाऊ शकतो. अशा उपक्रमांची कल्पक आखणी करण्याचे आव्हान खागोलशास्त्रावर प्रेम असणाऱ्या सर्जनशील कलावंतांपुढे आहे. एवढेच नाही तर वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याच्या भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या कर्तव्याशी देखील सुसंगत आहे. 


ॲस्ट्रॉन- एस एच के ट्रस्ट या संस्थेतर्फे 'ॲस्ट्रोटेन्मेंट' हे दोन दिवसांचे शिबीर प्रत्येक वर्षी मे  महिन्यामध्ये आयोजित केले जाते. या वर्षी दिनांक 6 व 7 मे रोजी हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नारायणगाव जवळील खोडद येथील GMRT ला भेट, याचबरोबर आकाशदर्शनामध्ये नक्षत्रांची माहिती, दुर्बिणीद्वारे गुरु, शनि, मंगळ या ग्रहांबरोबरच तारकापुंज व द्वैती तारे बघण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एरिक डेब्लॅकमिअर या अमेरिकन अॅस्ट्रोनॉटशी बोलायची संधी या वेळी मिळणार आहे. फिल्म्स व स्लाइड-शो, तसेच विविध वैज्ञानिक उपक्रम, विशेष चर्चा, वाद-विवाद, खेळ यांचा समावेश शिबिरामध्ये करण्यात आला आहे.
माहिती व नोंदणीसाठी इच्छुकांनी ८८०६१०७५१० या क्रमांकावर अथवा admin@astron.org.in या ई - मेलवर संपर्क साधावा, www.astron.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी

Register at: 
http://goo.gl/forms/rS4Bd51A7d